STORYMIRROR

Vasudha Naik

Tragedy Others

3  

Vasudha Naik

Tragedy Others

मनाची उलघाल

मनाची उलघाल

1 min
171

लग्न झाले, संसाराला लागले

मुलंबाळे झाली, आनंदात नहाले....


नवऱ्याचे आजारपण सुरू झाले 

सतत काही न काही होवू लागले...


डोळ्याची, हाताची शस्तक्रिया झाली

आजाराची कुरकुर सतत चालली...


अचानक डोके दुखायला लागले

यांना का असे होतेय ते शोधले....


एम. आर. आय. काढला, सेवा केली 

मेंदूमधे एक गाठ डॉ. ना सापडली...


शस्त्रक्रिया करायची वेळ आली

वसुधा मनातंच खूप, खूप रडली...


वसुधा खचली मात्र अजिबात नाही

डॉ.. ना वसुधा सांगी सर्व काही..


शस्त्रक्रिया झाली, चेहरा मात्र बिघडला

यांच्या वेदना पाहून जीव कळवळला...


काही महिन्याने परत तेच सुरु

आता समजेना मी काय, कसे करू...


डॉ. बोलले हे असेच आता राहणार

मी म्हटले मी हार नाही मानणार...


मुंबईच्या मेंदू सर्जनची वेळ घेतली

मी यांची व्यथा त्यांना सांगितली...


माझा माणूस मला मिळेल का?

माझा माणसाला काही होईल का?..


प्रश्न विचारून माझी शंका दूर केली

डॉ.. ची ख्याती मला होती कळली...


डॉ.. बोलले हो तुझा माणूस तुला देतो

आता मी शस्त्रक्रिया करतो...


तो एक तास खूप तापदायक गेला

पण माझा माणूस मला परत पहायला मिळाला....


प्रचंड दडपणाखाली वावरले त्या दिवसात

आता जरा राहतेय मी खरोखर आनंदात....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy