STORYMIRROR

Vaibhav Mahajan

Inspirational

3  

Vaibhav Mahajan

Inspirational

ध्येय

ध्येय

1 min
279

उठ तू का बसला असा

तुला काही करायचंय

स्वप्नांचा आधार घेवूनी या 

जगाला रंगवायचंय


स्वप्न फक्त पाहायचं नाही 

तर तुला ते पूर्ण करायचंय

आता युद्ध मांडलं गेलंय

तुला फक्त लढायचंय


जर आता तू नाही लढलास

तर सारं जीवन गमावायचंय

अरे, असा बसू नको तुला काही करायचंय....


मानलं, स्वप्न तुझं कठीण आहे 

पण अशक्य तर नाही ना

मातीने बनलेली तू एक बाहुली तर नाही ना

की हरला तर मारायचंय

म्हणून भिऊ नको उठ

तुला काही करायचंय


तुला अागी सोबत जमवून 

सोन बनायचंय

स्वप्न फक्त पाहायचं नाही 

तर ते सिद्ध करायचंय

 

उठ का बसलाय असा

तुला काही करायचंय.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational