बालपण
बालपण
अमूल्य वेळेचं बंधन न्हवतं,
न्हवता कोणत्या गोष्टीचा त्राण
उन्हा-पावसाचं भान न्हवत,
नव्हती खोट्या दुनियेची जाण
खेळाचे विविध डाव रंगायचे,
भांडण मस्तीत मन जुंपायचे
शिक्षणाचे धडे गिरवत गिरवत,
अक्ख गाव धुंडत फिरायचे
विटीदांडूची मज्याचं न्यारी,
होती क्रिकेटची आवड भारी
राग रुसव्याची संगत सोडून,
होती कट्टयावरील रंगत खरी
हुंदडण्याची आवड मनी फार,
भर उन्हात जंगल फिरायचो
एक रुपयाच्या पेपशी साठी,
बापाकडून पैका गोळा करायचो
अभ्यासात न्हवतं फारसं लक्ष,
मन आतुर असे घंटेच्या नादावर
फिरायची दिशा ठरलेली होती,
अंघोळ करण्यास जायचो नदीवर
बालपणीचे अविस्मरणीय किस्से,
आता नव्याने जगावेसे वाटतात
जुन्या आठवणींना उजाळा देताच,
डोळे माझ्या नकळत पाणावतात
