सूर प्रेमाचे...
सूर प्रेमाचे...
मंजुळ बासुरीचे सूर जसे जुळतात,
तसेच काहीसे जुळलेत आपले प्रेमबंध
हृदयीकप्प्यात दडवुन ठेवलंय सखे तुला,
अबोल्यात गुरफटूनही आहोत एकसंघ...!!!
खूप दिसानी घेतलं आज कवेत तुला,
तू करत होतीस मनोमिलनाचा साज
सूर-मधूर पिरतीचे मज कानी पडता,
झटकली अंगी संचारलेली लाज...!!!
प्रसन्नता ठेवणारा दरवळ पुष्पांचा,
सुख-शांती देत होता आयुष्यभराचे
पापण्यांची चकमक झगमगत होती,
जुळून आले सूर माया-ममतेचे...!!!
गुंतून ठेवेन मी सदा गीतामध्ये तुला,
रचेन आगळेवेगळे सुरताल तुजसाठी
संगत घेऊनी तोडक्या लेखणीला माझ्या,
घट्ट होण्या सात जन्म प्रिये तुजसाठी...!!!
आगळीवेगळी मिसळण होते सुरांची,
तुझ्या-माझ्या आपुलकीच्या प्रेमळ बंधनांची
दिखाव्याचा प्रेमप्रपंच नको मजला प्रिये,
गरज आहे तुझ्या खऱ्या प्रेमाची...!!!
गरज आहे तुझ्या खऱ्या प्रेमाची...!!!
तरच जुळतील सूर प्रेमाचे
जन्मोजन्मीच्या अतूट नात्याचे...

