STORYMIRROR

Ajay Ghanekar

Romance

3  

Ajay Ghanekar

Romance

कधी येशील तु..."!!

कधी येशील तु..."!!

1 min
274

बेधुंद होऊन जातो पाहुन ,

गालावरील गोंडस खळीला

जिव कासाविस होतो सखे,

माझा तुला रोज भेटन्याला ||धु||


मी तुझा कृष्ण तु माझी राधा,

जडलेय मज तुझीच प्रेमबाधा

छळतो दुरावा माझ्या मनाला,

आठवते मज तु क्षणाक्षणाला


का इतुकी ओढ तुझी हृदयाला,

तुच माझ्या जिवनाचा प्याला || 1||


आठवतो अदाकारी मुखडा तुझा,

भावतो तुझ्या या प्रेमवेड्याला

हृदयाच्या कप्प्यात दडवुन प्रिये,

तुझं अस्तित्व मज दे आधाराला


वेड लावीले माझीया काळजाला,

तुझ्याविना कोरडा हा पावसाळा ||2||


स्वप्नातही येतेस माझ्या विसाव्याला ,

तुझ्याविना अर्थ नाही या जगण्याला

ही साथसोबत आपली जन्मोजन्माची,

मनी एकच आस तुला भेटण्याची


कधी येशील तु माझ्या संगतीला ,

सात पावलांची ही साथ द्यायला ||3|


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance