सीमेवरचा सैनिक
सीमेवरचा सैनिक
कसा निर्भय उभा साक्षात वटवृक्ष,
देशसेवा करणं हाच त्याचा पक्ष
जगणं मरणं सारं मातृभूमीसाठी,
सदैव असतो आपल्या कार्यात दक्ष
घरदार सोडून देशरक्षणासाठी गेला,
चिमुकल्या लेकराला ह्रदयी ठेविला
आनंदाची दिवाळी सीमेवरच त्याची,
लढा देण्यास हिंमतीने सज्ज झाला
थंडी,वारा,पाऊस सारंकाही झेलतो,
आपल्या मनाला तो कठोर बनवितो
शत्रूंचे वार निधड्या छातीवर झेलतो,
हसतखेळत तो मरणाला स्वीकारतो
आपण सुरक्षित,निष्काळजी आहोत,
फक्त अन फक्त त्यांच्याच आधारावर
रातीचे जागतात, दिवसा नाही थकत,
दाखवुनी हिंगा स्वतःच्या हिंमतीवर..
आईच्या कुशीत निजावं त्यांनाही वाटतं,
पत्नीमुलांच्या दुराव्याने मन सतावत..
सीमेवरील संकटांना दोन हात पुढे करत,
सळसळतं रक्त त्याचं मातीत मिसळत
