कोकणातील घर
कोकणातील घर
1 min
679
निसर्गाने वेढलेलं,
सुंदर आमचं घर
मातीचा सुगंध जणू,
झमझमीत अत्तर
मातीनं लिपलेलं ते,
नाव त्यावर कोरलं
लाकडाची खिडकी ती,
जणू तुरुंग भासलं
अंगणाला भावणारी,
तुळस ही शोभिवंत
जसा काही वसलेला,
देव माझा मूर्तीवंत
सडा सारवनाने हे,
अंगण सजवलेलं
घरदार सारं माझं,
प्रेमानी बहरलेलं
घराच्या मागे दडली,
पानाफुलांनी वेढली
पक्ष्यांचा किलबिलाट,
परसबाग सजली
हृदयी मावणार नाही,
जणू सोन्यानी वेढलं
पोटापाण्यासाठी आम्ही,
हे घरदार सोडलं
