आई
आई
1 min
162
आई
तुझं नाम
आहे दोन अक्षरी
तुझी किर्ती साऱ्या जगतात
आई
तुझं रूप
जणु देवीचा अवतार
धन्य झालो तुझ्या पायथ्याशी
आई
जन्म दिला
स्वर्ग सुख दाखविला
संस्कार शिदोरी तुझी देणगी
आई
तुझ्या उदरात
असताना मीगं तान्हा
किती कष्ट केलेस लाखमोल
आई
थोर उपकार
जन्म देऊनिया मला
सांभाळ केला रक्षक होऊनी
आई
तुझी माया
देते सुखद सावली
जीवापाड जपते तिच आई
आई
तुझं अस्तित्व
महान आहे जगती
जगण्याची शिकवण तुच देई
आई
आनंदाची भरती
तुझिया नामात स्पुर्ती
मज मिळे अमापसुख निरंतर
