कर्कच्या वाटेवर
कर्कच्या वाटेवर
फुलवलं तर आयुष्य आहे सुरेख,
नका जाऊ व्यसनाच्या आहारी
खाऊनपिऊन छान रहा तंदुरुस्त,
नका जडउन घेऊ नकोती बिमारी
सिगारेट, तंबाखूला नका लाऊ हात,
सोन्यासम देहाची का लावता वाट??
धुरांच्या धुक्यात गुदमरून माणसा,
कर्करोगाच्या वाटेत होईल तुझा घात
तुमच्या मरणाचे तुम्हीच साक्षीदार,
धोक्याची पातळी तुच करतोस पार
भागते नशा पोट धुरमयात मिसळता,
जाणून घे रे सुखी जीवनाचा सार...
जीवघेण्या रोगाच्या तुरुंगात अडकून,
का जिवाची गड्या नासाडी करतोस
स्वतःच्याच कर्माची तु फळ भोगतोस,
का बरं कुटुंबाला वाऱ्यावर सोडतोस?
बहुमोल जन्म एकदाच आहे गड्यांनो,
लुटा आनंद आपल्या कुटुंबासमवेत...
व्यसनाचा नायनाट करुनी घ्या तुम्ही,
रहा हसतखेळत व्यसनविरहित सोबत
