प्रीत तुझी माझी
प्रीत तुझी माझी
तुझी माझी गुंतलेली प्रीत,
अशीच सदा बहरत राहिल
तुझ्या माझ्या गोड नात्याला,
दृष्ट नजरेने ना कोणी पाहील
तू आलीस जीवनी माझ्या,
घेऊन सुख-समाधानी लाट
तुझ्या गोड स्वप्नी रंगुन माझी,
अविस्मरणीय उजाडते पहाट
कित्येकजण भरतील तुझे कान,
माझ्याविरुद्ध करील कारस्थान
तु मात्र कधीच डगमळू नको प्रिये,
हृदयी माझ्या फक्त तुलाच आहे स्थान
आयुषाच्या वाटेवर चालताना,
येतील छोटेमोठे खाचखळगे
धैर्याने साऱ्यांवर मात करू दोघ,
सोडून दूर जाऊ नकोस कधी जिवलगे
आपल्या दोघांचं घट्ट हे नातं,
सदा फुळावानी फुलत रहावं
सारा राग रुसवा दूर करुनी,
आयुष्य आपण सुखात जगावं
