एक फुल गुलाबाचं
एक फुल गुलाबाचं
फुलला माझा चेहरा,
अन गेलो परसबागेत
गुलाबाची टवटवीत फुलं,
छान डुलत होती रांगेत
सकाळचे ते कोवळे ऊन,
अन मातीचा अत्तरी सुगंध
बहरलेल्या त्या फुलांचा,
पसरलेला चहुकडे गंध
दवात न्हालेली ती फुलं,
त्यांचं आकर्षित करणारं रूप
फुललेल्या त्या पाकळ्या,
अन मनमोहक स्वरूप
मोह मग आवरेना मजला,
दबक्या पाऊली गेलो पुढ्यात
हळुच मग डेट खुंटला,
आनंद मावेना गगनात
आजचा दिस तिचा-माझा खास
खुलवायचं होतं हास्य मुखड्याचं
हात नकळत पुढे सरसावले,
दिलं हाती एक फूल गुलाबाचं

