लाॅकडाऊनचा गोंधळ
लाॅकडाऊनचा गोंधळ


कोल्हापूरच्या अंबाबाई गोंधळाला या या
आहो जेजूरीच्या खंडेराया गोंधळाला या या
आहो पण येणार कसे
तुम्ही सुद्धा अडकलात
या लाॅकडाऊनच्या बेडीत
आणि भक्तांना तुमच्या दारी
आता कोणी नाही सोडीत
तेव्हा घरातच मांडलाय गोंधळ देवा गोंधळाला यावे
आहो चहाचे कप रिचवतात सारे
सोबत फुटकळ खाण्याचे झाड
वरून फोनवर चाटींग करताना
कळवतात झालोय आम्ही जाड
वाटतेच भिती वजनाची तर
थांबवा की जिभेचे भलतेच लाड
तेव्हा सुबुद्धी देवा सार्यांना धाडत गोंधळाला यावे
घरात राहून नियम पाळणे हा
नका समजू कोणताच गुन्हा
घ्या काळजी घरातल्या जिवलगांची
नाही सोपे जीव हा मिळणे पुन्हा
तेव्हा या महामारीवर तोडगा काढत गोंधळाला यावे
गोंधळ माडंला न देवा गोंधळाला या या