पावसाचे रूप ( सहाक्षरी )
पावसाचे रूप ( सहाक्षरी )
( सहाक्षरी )
पावसाचे रूप
प्रत्येका भावते
चिंब साऱ्यांनाच
करून टाकते
होड्यांची शर्यत
किल्ला तो वाळूचा
पावसात खेळ
असा चालायचा
मित्रांसोबत ती
पाऊस सहल
शर्ट तो काढून
चिंबच करेल
वेध लावणारा
पाऊस यौवनी
बरसे नयनी
विरह कहानी
उतार वयात
पाऊस पडतो
अत्तराची कुप्पी
नव्याने खोलतो