STORYMIRROR

अक्षता कुरडे

Drama Romance Others

3  

अक्षता कुरडे

Drama Romance Others

प्रेम, विश्वासघात आणि प्रेम...

प्रेम, विश्वासघात आणि प्रेम...

1 min
12.2K

हो नाही येत व्यक्त होता तुझ्यासारखं..

म्हणूनच शब्दांचा आधार घेऊन

माझ्या मनात असलेल्या प्रेमाचा

बांध मोकळं करतोय,

आज मी माझं प्रेम व्यक्त करतोय...


भडाभडा बोलून मोकळी होतेस

मी गप्पच असतो म्हणून 

सारखी रुसवा धरून बसतेस म्हणूनचं,

आज मी माझं प्रेम व्यक्त करतोय...


व्यक्त होता येत नसलं

तरीही जिवापाड प्रेम करतो

तुझ्या प्रत्येक चुका सांभाळून

आज मी माझं प्रेम व्यक्त करतोय...


गेलीस तोऱ्यात सोडून तू तेव्हा

जाताना पाहिलं सुद्धा नाही मला

आजही आपली पहिली भेट मला आठवतेय,

आज मी माझं प्रेम व्यक्त करतोय...


साथ तुझी सोडणार नाही

कितीही झालं तरी परक तुला करणार नाही

तुझी प्रत्येक खोटी वचने आठवून हसतोय,

आज मी माझं प्रेम व्यक्त करतोय...


लग्नात तुझ्या लाजून मिरवत होतीस

जणू काही प्रेम पहिल्यांदा अनुभवत होतीस

तुझ्या खऱ्या प्रेमाचा आज मला साक्षात्कार होतोय,

आज मी माझं प्रेम व्यक्त करतोय...


खऱ्या प्रेमावरून विश्वास उडाला

माझ्यातल्या मनाला तडा गेला

आई चा विचार करून मी ही लग्न करतोय,

आज मी माझं प्रेम व्यक्त करतोय...


व्यक्त तिलाही होत नाहीये

माझ्यासारखीच अबोल राहून 

तिच्यातल्या प्रेमाची कबुली तिच्या डोळ्यांतून सांगतेय,

आज मी माझं प्रेम व्यक्त करतोय...


आपल्या सारखी व्यथा तिची होऊ देणार नाही

माझ्यावर खरं प्रेम करणाऱ्या ला आयुष्यभर साथ देणार

म्हणून पुन्हा नव्याने प्रेमात पडतोय,

आज मी माझं प्रेम व्यक्त करतोय...

आज मी माझं प्रेम व्यक्त करतोय...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama