कोरोनाने शिकवले (लॉकडाऊन)
कोरोनाने शिकवले (लॉकडाऊन)


वुहानमधला पाहुणा विमानाने घुसला,
जगभर पाय पसरून घशात जाऊन बसला
विज्ञानाची ऐशी तैशी महासत्तेलाही वाकवले
मानवतेचे खरे जगणे कोरोनाने शिकवले
निसर्ग गाली हसला, कारण दिसला नाही धूर
प्राणी, पक्षी गाऊ लागले, स्वच्छ पर्यावरणाचा सुर
रस्ते केले साफ त्याने प्रदूषणाला झुकवले,
नियमाने जगणे आज कोरोनाने शिकवले
मंदिर-मस्जिद भक्तीचा नाही दिसला कुठे पेव
पोलीस आणि डॉक्टरमध्ये आम्हास दिसला खरा देव
शासनाचे नियम पाळून आम्ही गैरवृत्तीला चुकवले
मानवतेचे खरे जगणे कोरोनाने शिकवले
नाही चालला जादूटोणा नाही कुठला जंतर मंतर
स्वार्थाच्या शर्यतीपासून आम्ही ठेवले सुरक्षित अंतर
पैसा-पाण्याला किंमत नाही अन अहंकारालाही वाकवले
मानवतेचे खरे जगणे पुन्हा कोरोनाने शिकवले