शाई पुरती लोकशाही
शाई पुरती लोकशाही


शाई पुरती लोकशाही
पुरे झाली आता
मतदानाच्या नावाखाली नको
विकासाच्या बाता
मतांसाठी झोळी घेऊन ठोठावती दरवाजे
विजयानंतर खुर्चीवरती विराजमान राजे
महागाईच्या नावाखाली गोरगरीब लाथा
शाई पुरती लोकशाही पुरे झाली आता
अन्नदाता शेतकऱ्याला मिळेल सुखाचा घास?
कि कर्जाच्या डोंगराखाली पुन्हा गळ्याला फास
मेलेल्यांच्या टाळूवरचे लोनिसुद्धा खाता
शाई पुरती लोकशाही पुरे झाली आता
">आई बहिणीची अब्रू इथे रस्त्यावरती टांगली जाते
निधीच्या नावाखाली सबलीकरणाचे खाते
स्त्री पुण्याईसाठी वाचा सावित्रीच्या गाथा
शाई पुरती लोकशाही पुरे झाली आता
रोजगार शिक्षण गरिबीची चालवली तुम्ही थट्टा
श्रीमंताच्या गुलामीचा पैसा तुम्हाला मोठ्ठा
मातीशी इमानीच्या थांबवा खोट्या बाता
शाई पुरती लोकशाही पुरे झाली आता
जनताजनार्धना तुम्हीच काय ते ठरवा
पापपुण्याचा घडा मतदानात भरवा
झाले गेले खूप सोसले शहाणे व्हा रे आता
शाई पुरती लोकशाही पुरे झाली आता