STORYMIRROR

Sagar Nanaware

Others

3  

Sagar Nanaware

Others

व्यायामाचा विमा

व्यायामाचा विमा

1 min
316

पैशामागे धावता धावता

व्यायाम होतोय धीमा 

आयुष्य होतंय रीस्की 

म्हणून काढावा लागतोय विमा


जगण्यासाठी खाण झालं 

खाण्यासाठी जगणं 

तोंडाला सुटलं पाणी अन् 

विसरलो शरीराकडे बघणं 

ओल्या सूक्या पार्ट्या जेव्हा 

ओलांडतात येथे सीमा 

आयुष्य होतंय रीस्की 

म्हणून काढावा लागतोय विमा


पोळीभाजी मागे पडली 

पुढे पिज़्ज़ा आणि बर्गर 

जंकफूड च्या मोहापायी

बिघडत गेली फिगर 

चमचमीत जगण्याचा 

डायबेटिसने केलाय खीमा 

आयुष्य होतंय रीस्की 

म्हणून काढावा लागतोय विमा


बिझीपणाच्या नावाखाली 

पोटाचं होतंय पोतं

गोळ्या औषधांशी मात्र 

घट्ट झालंय नातं

शुगर बीपी जोडीने इथे 

केलाय मोठा ड्रमा

आयुष्य होतंय रीस्की 

म्हणून काढावा लागतोय विमा


शरीरासाठी झटण्याचा

कसला आलाय त्रास 

दीर्घायुषी जगण्यासाठी 

व्यायाम हवा हमखास 

सुदृढ निरोगी जगण्याची 

यांना थोडी बुद्धी देरे रामा 

आयुष्य होईल झकास 

मग कशाला लागेल विमा


Rate this content
Log in