STORYMIRROR

Sneha Kshirsagar Jathar

Drama Fantasy

3  

Sneha Kshirsagar Jathar

Drama Fantasy

माझी नाती

माझी नाती

1 min
15.8K


समुद्रा किनारी बसले होते, विचार करत पूर्व आयुष्याचा,

काय कमवले काय गमवले, अट्टहास होता ते निरखून पहायचा ।।१।।


मूठ बंद करताना हळू हळू वाळू, बोटांच्या फटीतून निसटत होती,

आयुष्यातील गुपितं, आठवण करून देत होती ।।२।।


समुद्राएवढी खोल नाती, लागतो ज्यांचा आपल्याला सहवास,

करतात पण किती सारे, सोबत आपल्या क्षितिजाएवढा लांब प्रवास ।।३।।


पाण्यावर उडणाऱ्या पक्ष्यांनी, आठवण करून दिली आई वडिलांची,

ज्यांनी दिले मला मोकळे आकाश, उंच झेप घेण्यासाठी ।।४।।


किनारी झुलणाऱ्या मंद गार वाऱ्यानी, आठवण केली लहान भावाची ,

ज्याच्या मायेचा हात राहील, आजीवन माझ्यापाशी ।।५।।


समुद्राच्या उंच लहान लाटा पाहून, मला माझे मित्र आठवले,

आयुष्यातल्या चांगल्या वाईट दिवसात, कुटुंबासारखे जे माझ्या सोबत होते ।।६।।


आकाशातील ढग दूर क्षितिजावर, समुद्राला टेकले होते,

जीवनातील जोडीदाराची, आठवण करून देत होते,

येण्याने ज्याच्या, आयुष्याला नवीन मोहर फुटले होते ।।७।।


शिंपल्यात मोती सापडावा जसा, माझी चिमुकली माझ्या आयुष्यात आली,

देवकृपेने मिळालेला हा रत्नच जसा, जपून ठेवणार आहे मी तिची आई ।।८।।


हातातील वाळू संपेल जेव्हा, डोळे बंद होतील जेव्हा,

आयुष्य सार्थक होईल तेव्हा, लोक आठवण काढतील जेव्हा ।।९।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama