पहिले पाढे पंचावन्न
पहिले पाढे पंचावन्न
आटपाट नगरात एका नव्हती राणी आणि राजा
दैनंदिन जीवनात व्यस्त होती फक्त प्रजा
एके दिवशी नगरात आला राक्षस नाव त्याचं करोना
माणसं खाऊ लागला पटापट उडवली सर्वांची दैना
माणसं बिचारी घाबरली अन् सैरावैरा पळाली
बाहेर जाताच राक्षस खातो म्हणून घरातच दडली
व्यायाम करा अन् सात्विक खा अन्न
पटू लागलं मग साऱ्यांनाच विद्वानांचं म्हणणं
घराघरात घुमू लागले स्तोत्र मंत्र आणि श्लोक
संवादाची दरी मिटली खूष झाले सारे लोक
साध्या रहाणीबद्दल घडू लागल्या चर्चा
एकमताने साऱ्यांचे ठरले कमी कराव्या गरजा
शांत झाले नगर अन् झाली हवा शुद्ध
महापुरुष अवतरले नगरी घेऊनिया तीर्थ
प्राशन करता तीर्थ गेला राक्षस करोना पळून
सुटकेचा निःश्वास टाकिती नगरातील प्रजाजन
किती दिसांनी मोकळेपण प्रजा गेली चेकाळून
आरूढ होऊन रथ अन् अश्वांवरती ठणाणती जोरानं
विसरले संवाद कुणाशी अन् घरातील सात्विक अन्न
हिरमुसली बालके आणि घरचे वृद्धजन
पाहूनि सारा कोलाहल विद्वानांचे झाले मन विषण्ण
इतुकी झाली शिक्षा तरी पहिले पाढे पंचावन्न
मग काय!
काय ते प्रदूषण
काय ती मॉलमधली खरेदी
काय त्या हाटेलासमोरच्या रांगा
सगळं एकदम ओक्के!
