शहरातील पाऊस
शहरातील पाऊस
नको बा पावसा नको असा रे कोसळू
चंद्रमौळी छत माझे लागले रे गळू
कोसळती घरे जसे पत्त्यांचे बंगले
उध्वस्त करी संसार साऱ्यांचे जीव रे टांगले
रस्ते झाले तळी सारी गटारे तुंबती
पाण्याचा झाला सागर गाड्या ठप्प होती
शाळेला मिळे सुट्टी मुले हासती नाचती
फर्माईश होते तळा कांद्याचीच भजी
धबधब्यात जाते तरुणाई भिजायाला चिंब
धोक्यात घालून आपुला अमूल्य तो जीव
वाहूनिया जाता करती सारे आप्त आक्रोश
जगावेगळा मुंबईचा की हो पाऊस
