STORYMIRROR

Pratibha Tarabadkar

Abstract

3  

Pratibha Tarabadkar

Abstract

आयुष्याच्या या वळणावर

आयुष्याच्या या वळणावर

1 min
407

वाफाळत्या चहाचा कप, हातात ताजा पेपर आणि थोडे निवांत क्षण

आयुष्याच्या या वळणावर आणखी काय हवं

मुलांचे नियमित फोन, तब्येतीची चौकशी, स्वरात ओथंबलेली आस्था

आयुष्याच्या या वळणावर आणखी काय हवं

नातवंडांचे लडीवाळ बोल, गंमत सांगायची लगबग, आजोबा आजी म्हणून घातलेली साद

आयुष्याच्या या वळणावर आणखी काय हवं

नव्याने जोपासलेले छंद, जुन्या मैत्रीचा जागर,फोनवर रंगलेल्या गप्पा

आयुष्याच्या या वळणावर आणखी काय हवं

गाण्याची मुक्त लकेर, मोबाईलमध्ये व्यस्त, नवं तंत्रज्ञान वापरतो बिनधास्त

आयुष्याच्या या वळणावर आणखी काय हवं

झालं गेलं विसरून जावं, जीवनगाणं गाणं गात रहावं

आयुष्याच्या या वळणावर आणखी काय हवं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract