बंध
बंध
तुटेल इतकं ताणायचं नसतं
जोडणं कठीण असतं जाणायचं असतं
किती वेळा पुढे करायचा मैत्रीचा हात
पण समोरच्याच्या मनात नसते द्यायची साथ
मनाच्या फुलपाखराचे मग मिटून जातात पंख
अन् स्नेहाच्या धाग्याचे तुटून जातात बंध
उडून जातात आपुलकीच्या भावनांचे रंग
अन् पुन्हा पुन्हा होत रहातो अपेक्षांचा भंग
आपल्या सततच्या वाकण्याने त्यांचा अहम् फुगत जातो
त्यांच्या अशा वागण्याने आपला संयम तुटत जातो
एकाच बाजूने कधी बांधता येतो का पूल?
किती दिवस पांघरायची दिखाव्याची झूल?
आपल्याला सुद्धा आत्मसन्मान असतोच ना!
नाण्याला दुसरी बाजू असतेच ना!
डेड एंड आलाय लक्षात घ्यायचं असतं
कधी कुठे थांबायचं जाणायचं असतं
'तुम नहीं तो और सही ' म्हणायचं असतं
अन् डोळे उघडून आजूबाजूला निरखायचं असतं
मैत्रीचा हात पुढे करणाऱ्यांकडे पाहून हरखायचं असतं
त्यांचा हात स्विकारायचा असतो
त्यांचा हात स्विकारायचा असतो
