एव्हढे लक्षात ठेवा
एव्हढे लक्षात ठेवा
तुलना नको कुणाशी,
प्रत्येक वेगळा जीव
वेगळाच त्याचा मार्ग
एवढे लक्षात ठेवा
दान जरी सर्वश्रेष्ठ
तरी तारतम्य ठेवा
कोठे देणे कधी थांबणे
तेवढे लक्षात ठेवा
अपत्यावरी जरी प्रेम,
मन न त्यात गुंतवा
हलकेच व्हा अलिप्त
एवढे लक्षात ठेवा
धन जरी असे श्रेष्ठ,
योग्य मार्गे मिळवा
कुमार्गे मिळता पतन
एव्हढे लक्षात ठेवा
वाचन, लेखन, कोणताही
छंद असावा एक
प्रसन्न राहते मन
एवढे लक्षात ठेवा
नवनवीन तंत्रज्ञान,
आत्मसात कराया
सज्ज रहावे सदा
एवढे लक्षात ठेवा
सर्वात शक्तीशाली
आहे आपुले मन
आनंदी असूद्या सदा
एवढे लक्षात ठेवा
