छंद
छंद
छंद म्हणजे छंद म्हणजे छंद असतो
पैशांचा आणि त्याचा काही संबंध नसतो
कोणी काव्यात रंगतो तर कोणी भजनात दंगतो
कोणी गडकिल्ले चढतो तर कोणी पुस्तकात गढतो
कोणी संगीतात डुंबतो तर कोणी जंगलं धुंडतो
कोणी रांगोळीत रमतो तर कोणी चित्रात गुंततो
प्रत्येकाचा छंद आगळा, प्रत्येकाचा मोद वेगळा
जीवनाचा सूरताल छंदानेच
गवसतो सगळा
छंद म्हणजे छंद म्हणजे छंद असतो
पैशांचा आणि त्याचा काही संबंध नसतो
कोणी म्हणे छांदिष्ट कोणी म्हणे खूळ
पण हेच तर असतं आमच्या आनंदाचं मूळ
छंद म्हणजे सुखी माणसाचा सदरा असतो
तो चढवला की दुःख विवंचना विसरायला लावतो
आणि म्हणूनच तो आमचा आत्मानंद असतो
छंद म्हणजे छंद म्हणजे छंद असतो
पैशांचा आणि त्याचा काही संबंध नसतो
