आई
आई
1 min
176
का सोडून गेलीस मजला
अशी तू न सांगता,
कोणता गुन्हा घडला असा
अशी सजा दिलीस मजला,
ऊन वारा पाऊस गारा असे
कसे अबोल झाले,
घरामधले देवपण बघ एकदम
कसे पोरके झाले,
अंगणामधली तुळस माझी अशी
कशी वांझ झाली,
बागेमधली फुले बघ एकदम
कशी सांझ झाली,
अशी कशी अचानक समुद्राला
भरती आली,
अशी कशी रात्र ही आज अमावस्याची
सवत झाली,
आभाळ हे सूर्याविना असे कसे
विधवा झाले,
सूर्याला ही भलतेच वेळी असे कसे
ग्रहण लागले,
सांग काय करू मी एकटा इथे
तुझ्याविना घर हे असे कसेवांझ झाले,
तू म्हणायची कायम मी तुझं हृदय
तू माझा श्वास आहे,
असे कसे हृदय माझे
माझ्या पासून दूर आहे,
तू परत ये आई एकदा
इथे सारे मुखवटे खोटे आहे।
