आभास
आभास
1 min
490
बंद डोळे, मिटलेल्या पापण्या,
ओठांवर हसू, गालावर खळी,
खळीवर तीळ, तीळावर केसांची बट,
गोड आवाज, स्मित हास्य,
कातिल नजर, डोळ्यांत काजळ,
कधीतरी, कुठेतरी, तुला पाहिलं असावं,
म्हणूनच मी डोळे मिटले की हुबेहूब
तुझं चित्र डोळ्यासमोर दिसावं...
अशीच असशील म्हणून मी
स्वप्नातचं मन रमावं,
तू कधी भेटलीच तर तुला
तुझ्यावर लिहिलेल्या कविता
तुला वाचून दाखवावं,
पहिलाच भेटीत मी पूर्ण
तुझ्या प्रेमात बुडवून जावं,
स्पर्श होताच तुझा मग
समुद्रात पण वादळ यावं,
मी डोळे मिटले की हुबेहूब
तुझं चित्र डोळ्यासमोर दिसावं
