STORYMIRROR

Sagar Wagh

Tragedy

3  

Sagar Wagh

Tragedy

बाप

बाप

1 min
339

दुष्काळाचा झळा सोसतोय

बाप माझा,

अंगावरती कपडा आता त्याचा

राहिला नाय,

भेगाळलेल्या भुईमधून सोनं उगवण्याची

ताकत हाय,

छप्पन इंचाची नसेल छाती पण इमानदारीने

जगतोय हाय,

उभ्या जगाचा पोशिंदा पण अर्ध्या भाकरीवर

निजतोय हाय,

आपल्या मुलाच्या भविष्यासाठी अंगावर ठिगळाची

बनियन हाय,

नाही पाऊस,पाणी,पण अंगावरच्या घामाने शेती

करतोय हाय,

सावकाराचं कर्ज हाय,शेतीसाठी पाणी नाय,पण

उपाशीपोटी पोरांना त्यानं कधी

निजवलं नाय,

दुष्काळाचा झळा सोसत,सावकाराचं कर्ज फेडत,

एक दिवस झाडावरती लटकताना

दिसला हाय,

अजून किती असे बाप झाडावरती लटकताना

दिसणार हाय??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy