STORYMIRROR

rekha popatrao Chavan

Romance

4  

rekha popatrao Chavan

Romance

३) मला फक्त तूच हवी

३) मला फक्त तूच हवी

1 min
1.0K


सौंदर्यापेक्षाही तुझ्या बोलक्या डोळ्यातला

समंजसपणा माझ्या मनाला भावला

तुझ्या हास्याच्या लकेरीचा सूर

नकळत माझ्या काळजात छेडला !!१!!


सालस रूप नि गुणांचे भांडार पाहून

आई-बाबांनीही तुला स्वीकारलं

लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश तुझा

सौख्यानं आपल्या घराला निवडलं !!२!!


संसारवेलीवर कळी फुलली

आपल्या प्रेमाचं प्रतिक होऊन

तुझ्या हृदयस्पर्शी वागण्यानं

प्रत्येकजण निघाला स्वर्गसुखात न्हाऊन!!३!!


अचानक आलेल्या भोवळीत

कॕन्सरने उडवले थवे आनंदाचे

खचलोयं,उद्ध्वस्त झालोय........

ऐकतोयं रूदन तुझ्या दीर्घ श्वासाचे !!४!!


मी,आई-बाबा अन् आपली लाडकी

सांग ना गं?कशी जोडतील ही भिंत पडकी

तू प्रेमाच्या धाग्यातं सर्वांना जोडले

तरीही नियतीनं आपलं घरटं का मोडलं? !!५!!


माझ्या काळजावर घातलायं काळानं घाव

थाटता येईल का पुन्हा विस्कटलेला हा डाव?

माझं सुन्न मन गातयं एकच ओवी

मला फक्त तूच हवी,मला फक्त तूच हवी......,!!६!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance