STORYMIRROR

rekha popatrao Chavan

Inspirational

3  

rekha popatrao Chavan

Inspirational

जगाला प्रेम अर्पावे

जगाला प्रेम अर्पावे

1 min
1.3K


सिंधू माईचे

निराश्रीत मन जागले

अनाथांना झाकले

पदराखाली !!१!!


मायेला पारखे

कोवळे अधीर मनोदय

सांधले हृदय

प्रेमाने!!२!!


अनाथांची माऊली

समाजाला पुरून उरली

परंपरा मोडली

धाडसाने !!३!!


निराशेच्या अंधाराला

नमविले चैतन्याच्या ज्योतीने

स्वत्वाच्या जाणीवेने

पेटविले !!४!!


सांभाळते माई

आरोग्य ,शिक्षण ,निवारा

आश्रमाचा डोलारा

वाक्चातुर्याने !!५!!


पुण्य कन्यादानाचे

साठवले नेत्री सूनमुख

सदैव हसतमुख

सिंधूमाय !!६!!


मनाचे मोठेपण

कृतज्ञतेचे अनोखे क्षमादान

निराश्रीतासम पालन

पतीराजाचे !!७!!


माईच्या श्वासाचे

व्रत ,निःस्वार्थ ,निस्सीम

जगाला प्रेम

अर्पावे !!८!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational