STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Romance

4  

swati Balurkar " sakhi "

Romance

आजही मन हे झुरते !

आजही मन हे झुरते !

1 min
448

इतकी वर्षे जे गुपित होतं ते सावरू मी कसं?

कधीकधी आजही मन हे झुरतं नाकारू कसं?

माझं घुटमळणं अन् तुझं दुर्लक्ष

वादात जगाच्या मात्र ,घेणं माझा पक्ष!


तुझं पुढे जाऊन वळून पाहणं प्रत्येकवेळी

मी वाग्दत्ता झाले तरीही तुझं मौन त्यावेळी!

आधाराची गरज असता, निघून जाणं अवेळी,

शेवटची ती भेटही स्मरते, त्या गर्द संध्याकाळी!


धरती चुकचुकली, आभाळ बरसले अवकाळी

शब्द न सुचले , ओठ मुके , नयन बोलके त्यावेळी!

आजची ही तारीख प्रत्येक वर्षी जेव्हा उगवते ना

हुरहुर लागते मला , माझ्यासारखीच तुलाही ना!


तोडले ते पाश नियतीने, परि मी तुला न विसरले

तुझ्या नावाने चेहर्‍यावर येते लाली , मन गहिवरते!

प्रेमाच्या व्याख्येत न बसलेले तुझे माझे नाते,

प्रेमदिवसाच्या निमित्ताने मात्र मी तुला मी स्मरते!


कशी लिहू मी प्रेमकथा ही ? मन माझे पुसते,

आता तू कुठे अन मी कुठे तरीही मन हे झुरते!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance