पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
पहिलं प्रेम...
हे आपण ठरवून करत नाही,
ते तर अचानक होत असतं...
नाही - नाही म्हणता म्हणता
आपण स्वीकारतो,
ते असतं पहिलं प्रेम...
त्याच्या एका नजरेसाठी
आपण सारी दुनिया भुलवतो,
ते असतं पहिलं प्रेम...
हजारो यातना सहन करूनही
फक्त त्याच्यावरच मरतो आपण
ते असतं पहिलं प्रेम...
शंभर चुकांनाही अगदी सहज माफ करून
आपण त्याचाच स्वीकार करतो,
ते असतं पहिलं प्रेम...
आपण कितीही जीव लावला,
तरीही ते आपल्याला शेवटी धोकाच देतं,
ते असतं पहिलं प्रेम...
त्याच्यासाठी आपला जीव कासावीस होताना पाहून,
तो फक्त आपली मजा घेतो,
ते असतं पहिलं प्रेम...
संपूर्ण जगातील सुख एकीकडे,
अन् त्याचं आपल्या सोबत असणं दुसरीकडे,
असं असतं हे पहिलं प्रेम...
हृदयाचे हजारो तुकडे करूनही
त्याला समाधान मिळत नाही,
ते असतं पहिलं प्रेम...
असं हे प्रेम क्षणोक्षणी जीवघेणं असतं,
परंतु तरीही का ते हवंहवंसं असतं...
पहिलं प्रेम...

