बेफिकीर ती...
बेफिकीर ती...
कितीदा आठवले तिला विचारांत...
कितीदा जपले तिला श्वासांत..
पण तरीही भाव ना तिला माझे समजले
कारण होती बेफिकीर ती....
अश्रू हे थांबेना, माझे ङोळयांमधील...
भावना या दाटेना उरामध्ये...
पण तिला काहीच फरक न पडे
कारण होती बेफिकीर ती....
काळजाचे झाले अपार तुकडे, फक्त तिच्याचसाठी...
शरीराचे झाले पूर्ण लाही लाही,तिला मिळविण्यासाठी...
पण ती तर एका खेळण्यासमवेत सोडूनि निघून गेली मला...
तिला तर काहीच फरक पडेना...
कारण होती बेफिकीर ती....
अजूनही थोडे त्राण आहेत,
या शरीरात फक्त तिच्याचसाठी....
वेड लावूनि माझ्या मना,
का बरं जगतेस तू दुसऱ्यासाठी....
कधी गं उमजतील
भाव तुला माझे हे प्रिये...
मी तर आहे फक्त
तुझ्याच प्रतिक्षेत सखे...
