ही लेक
ही लेक
1 min
200
गोड - गोजिरे रूप तिचे
सर्वच भुलूनी जाती...
मधुर -मधुर शब्द तिचे
ऐकण्या सर्वच उत्सुक होती...
अङखळणारे पाऊल तिचे
उद्याचे भविष्य दाखवी...
शब्दरूपी ज्ञान ऐकण्या
सारेच आतुर होती...
आपुल्या बाबाचा भार हलका करण्या
इवलेसे हात मग झटती...
आई - बाबांचे स्वप्नपूर्ती करण्या
यशस्वी गरूडझेप ती घेई...
अन् एक दिवस आपुले आंगण,
हक्काचे माहेर सोडूनि जाई ती
आपुल्या संसारी...
अशीच असते ही लेक
बाबाच्या काळजाची हुरहुर...
