कन्यारत्न
कन्यारत्न
1 min
379
कन्यारत्न
हे रत्न आहे मोलाचे
ज्या कडे आहे हे रत्न
तोचि या जगी श्रीमंत....
कित्येकजण नाकारतात तिला
हत्या तिची करण्या,
आतुर ते होतात....
केव्हा बरं कळणार यांस
मोल या रत्नाचे
हे रत्न आहे अनमोलाचे....
घरात तुमच्या वास असता
या रत्नाचा...
दूर होई तुमचे अठराविश्व दारिद्र्य
पायगुणांनी हो तिच्या भरभरून येईल ऐश्वर्य....
चार दिवसाचं ते पाहुणंपण
तुम्हांस का बरं होई ते अवजड
ते तर शेवटी परक्याचं हो धन....
केव्हा बरं कळणार आपणांस
मोल या रत्नाचे
हे रत्न आहे हो अनमोलाचे....
