STORYMIRROR

Priyanka Pawar

Inspirational

4  

Priyanka Pawar

Inspirational

कन्यारत्न

कन्यारत्न

1 min
788

हे रत्न आहे मोलाचे 

ज्याकडे आहे हे रत्न 

तोचि या जगी श्रीमंत....


कित्येकजण नाकारतात तिला 

हत्या तिची करण्या, 

आतुर ते होतात....


केव्हा बरं कळणार यांस 

मोल या रत्नाचे 

हे रत्न आहे अनमोलाचे....


घरात तुमच्या वास असता

या रत्नाचा...

दूर होई तुमचे अठराविश्व दारिद्र्य 

पायगुणांनी हो तिच्या भरभरून येईल ऐश्वर्य....


चार दिवसाचं ते पाहुणंपण

तुम्हास का बरं होई ते अवजड 

ते तर शेवटी परक्याचं हो धन....


केव्हा बरं कळणार आपणास 

मोल या रत्नाचे

हे रत्न आहे हो अनमोलाचे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational