Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priyanka Pawar

Others

4  

Priyanka Pawar

Others

💕🌹तू  पुन्हा ये 🌹💕

💕🌹तू  पुन्हा ये 🌹💕

1 min
23.6K


बोलावते गं मन माझं साजणी तुला 

तू पुन्हा ये एकदा...

निर्जीव जीवाला या सजीव करण्यां 

परतूनी तू पुन्हा ये...


सुरांच्या मैफिलीची रौनक बनूनी तू ये 

नृत्याच्या संगीताचा ताल बनूनी तू ये...


ऐक गं... साजणे तू पुन्हा ये 


जीव हा आसुसला तुला पाहण्यासाठी 

श्वास हा थांबला, तुझ्यातच बेधुंद होण्यासाठी...


पहाटेचं ते सुंदर पहिलं किरण बनूनी तू ये 

पौर्णिमेच्या आकाशातील चमचमती तारका बनूनी तू ये... 


दे तू आधार या जीवाला 

स्वीकार तू आज माझ्या प्रेमाला.... 


बोलावतं गं... मन माझं साजणी तुला 

तू पुन्हा ये एकदा... 


आस ही तुझीच मला 

ध्यास हा तुझाच गं मला... 


स्वप्न अपुरे पूर्ण करण्यां  

धावत तू साजणी ये...


Rate this content
Log in