STORYMIRROR

Priyanka Pawar

Others

4  

Priyanka Pawar

Others

कवितेचा जन्म

कवितेचा जन्म

1 min
234

कविता वाचायला सर्वांनाच आवडते. 

परंतु तिचा जन्म होतो तरी कसा??


कविता कवीच्या मनातील 

साठलेल्या शब्दांची गुंफण...


कविता कवीच्या मनातील

आठवणीची साठवण...


कविता कवीच्या हृदयातील 

भावनांची बेरीज- वजाबाकी....


कविता म्हणजे,

हृदयातील भावनांचा

विचारांशी जुळणारा 

शब्दांनुरूप समन्वय....


कविता रुजते मनात,

बहरते विचारांत, 

अन् फुलते शब्दांत...


Rate this content
Log in