भेटशील का तू...
भेटशील का तू...
सैरभैर नाव माझ्या मनाची
का शोधते तुला पुन्हा पुन्हा
आस आहे आजही तुझीच
भास हा सतावतो मनाला
विरह हा सहन होत नाही, जीवाला
सांग ना, भेटशील का तू एकदा मला....
ओल्या चिंब पावसात न्हाऊनी
आठवणी या सतावती उराला
तुझा गोड नखरा पाहून,
जीव हा आपुला तुझ्यावरीच भुलला
तुझ्या स्पर्शाचा लोभ आहे, आजही या शरीराला
फक्त तुझीच ओढ आहे, माझ्या या श्वासाला
सांग ना, भेटशील का तू एकदा मला.....

