STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

4  

Sakharam Aachrekar

Romance

भेटूयात पुन्हा....

भेटूयात पुन्हा....

1 min
385

एका बहरलेल्या संध्याकाळी

सूर्य जेव्हा अस्ताला जात असेल

सागरातल्या नीलतरंगांवर

अंधार अनामिक पसरताना दिसेल

स्थिर असेल तुझ्याच डोळ्यांत ही नजर

अन हातात या तुझा हात असेल

भाव हृदयातले नजरेतून सांगायला

भेटूयात पुन्हा....


एका शांत तळ्याकाठी

जिथे आणखी कोणी नसेल

माझ्या प्रीतीत तू गुंतता

तो पारिजात लाजून हसेल

रंगीत त्या गप्पांत आपल्याला

भविष्यातला स्वर्ग दिसेल

अशा स्वप्नातल्या प्रेमजगात

भेटूयात पुन्हा....


एका धुंद मध्यरात्री

जेव्हा खूप वारा सुटला असेल

आपण भेटता अचानक

पाऊसही बरसायला लागेल

छत्रीही असेल एक आपल्याकडे

पण ती उघडेस्तोवर हा आसमंत

आपल्यासह चिंब झालेला असेल

अशा स्वप्नात जगण्यासाठी

भेटूयात पुन्हा.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance