STORYMIRROR

Sonam Thakur

Romance

4  

Sonam Thakur

Romance

स्वप्नातील राजकुमार

स्वप्नातील राजकुमार

1 min
967

आयुष्यात माझ्या जेव्हा तो आला

परिकथेच्या राजकुमारासम मज तो भासला


माझ्या ध्यानीमनी सदैव तोच असे

स्वप्नातही मग त्याचा भास होत असे


कधी होईल तो माझा असे नेहमीच वाटत असे

परी मनातल्या ह्या भावना मी नेहमीच लपवत असे


स्वप्नातच त्याला मग मी वरले 

सात जन्माच्या बेड्यात त्याला मी अडकवले


सुरू झाला स्वप्नांतच मग संसाराचा खेळ

जागेपणीही स्वप्न पाहण्यात सरू लागली वेळ


स्वप्नातच बांधला मी आम्हा दोघांसाठी बंगला

रोजच्या ट्रॅफिकपासून दूर वनात निवांत चांगला


होते आमच्या बंगल्याला सुंदरसे अंगण

घराभोवती शोभे सुंदर जास्वंदीचे कुंपण


अंगणातल्या त्या तुळशीला घालत असे मी पाणी

आंब्यावरती कोकीळ गात असे मंजुळ गाणी


स्वप्नातच त्याने धरला माझा हात

उघडले नेत्र जेव्हा आठवुनी स्वप्न हसले गालात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance