सौंदर्याचा चोर!
सौंदर्याचा चोर!
नाकात प्रीतीची नथ तुझ्या
कपाळी प्रेमाची चंद्रकोर,
नयनांत धगधगती मशाल तुझ्या
भुवया तुझ्या इंद्रधनुष्याची कोर
ओठ तुझे लाल गुलाबी
प्रेमाचा लालिमा तुझ्या गालावर
सोनेरी चमक तुझ्या केसांची
घालतेय माझ्या नयनांना भुरळ,
देखणं तुझं हे रूप माझ्या
गेलंय काळजाच्या आरपार
केली नसून चोरी मी कधी
पण झालोय तुझ्या सौंदर्याचा चोर...

