आठवांचा हा कल्लोळ
आठवांचा हा कल्लोळ


आठवांचा हा कल्लोळ
मम मनी सतावतो
गत काळ वचनांच्या
स्मरणाने तो झुरतो...
नोकरीच्या निमित्ताने
गेला राजा परदेशी
दिली होती ती कबुली
पण आला नाही देशी...
गेले थकून नयन
दुःख माझे वियोगाचे
सांगू कसे रे कुणाला
मनातल्या आठवांचे...
प्रीत होती फुललेली
दोन जिवांच्या प्रेमाची
वचनाने बांधलेली
झाली आता वियोगाची...
विसरला तू मजला
रात्र रात्र आठवणी
झोप उडवी ती माझी
पुरे आता बतावणी...
चैन मज ते पडेना
तुझ्याविना राहवेना
मन घायाळ ते माझे
मला आता साहवेना...
आठवांचा हा कल्लोळ
मज घायाळ तो करी
आहे ठेवून ती आस
पुन्हा येईल तू घरी...