तुला मी आवडते
तुला मी आवडते
बघतोस तू एकटक
डोळ्यांना देऊन ताण रे
तुला मी आवडते
तू आता तरी मान रे
खरं सांगते तुला
तू दिसतोस छान रे
खोटं नाही सांगत
मी तुझी फॅन रे
मी कुठं म्हणते
मी सौंदर्याची खाण रे
पण मनाची सुंदरता
असतेना महान रे
तुला बघून माझी
भागते भूक तहान रे
तुझी राणी होण्याचं
घेतलंय मी वाण रे
तू भेटल्यापासून
हरवलंय माझं भान रे
घाल ओंजळीत माझ्या
प्रीतीचं दान रे
पाहतोस माझ्याकडे
न वळवता मान रे
माझ्या बोलण्याकडे
असतात तुझे कान रे
निस्वार्थी प्रेम माझं
तुझ्या गळ्याची आन रे
मी विचारतेय काही
तुला नाही जाण रे
प्रेमाची कबुली टाळतोस
आडवी येतेय का शान रे?
तुला मी आवडते
तू आता तरी मान रे
दोघं मिळून फुलवूया
आपल्या प्रीतीचे रान रे
तुला मी आवडते
तू आता तरी मान रे
तुला मी आवडते
तू आता तरी मान रे

