सप्तजन्माचे सोबती
सप्तजन्माचे सोबती
केली कसलीच
ना अपेक्षा कधीही मी
तू इतरांपेक्षा वेगळा
म्हणून पडले प्रेमात मी
म्हणाला होतास तू
हात हातात घेऊनी
स्वाभिमान तुझा ग
जपीन मी
आठवणीत सतत माझ्या
नेत्र सुजायचे तुझे रडूनी
आता जवळी आहेस तर
का जातोस पाठ फिरवूनी
तुझ्या प्रेमासाठी तोडली
सगळी बंधनं रे
तुझ्याच साठी ओलांडले
सप्तसागर रे
माहीत आहे मला
प्रेम तू ही करतोस
पण व्यक्त व्हायला
का तू भितोस
आहे माझा विश्वास
ठाम तुझ्यावरती
आहोत आपण
साताजन्माचे सोबती

