गर्द काळोखात मनाच्या
गर्द काळोखात मनाच्या
गर्द काळोखात मनाच्या
वाटते भिती हरवण्याची
चाहूल लागता तूझी
आठवण होते पावलांची
छुमछुमनारे पैंजण तूझे
मनाला देई हेलकावे
तुझ्या खोल श्वासामध्ये
चाफ्याने मुक्त दरवळावे
किती दडलेली कोडी
शोधावी का मनात माझ्या
का उलघडावे सारे चित्र
ह्दयाच्या कॅनव्हासवर तुझ्या

