STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

4  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

आठवे अजुनी मला

आठवे अजुनी मला

1 min
22.6K

लाजुनी हसणे तुझे ते आठवे अजुनी मला

आर्जवी बघणे तुझे ते आठवे अजुनी मला


भेटलो चोरून दोघे त्या उन्हाने पाहिले

केशरी दिसणे तुझे ते आठवे अजुनी मला


चहूकडे गावात पिकला खसखसीचा गं मळा

बघणे माझे तुझे ते आठवे अजुनी मला 


दातात दाबूनी अंगुली तू मला जे 

खुणाविले 

अंतरी झुरणे तुझे ते आठवे अजुनी मला 


भेट घडली शेवटी ती आता कुठे ना आठवे 

संगती असणे तुझे ते आठवे अजुनी मला 


मंतरलेले दिवस ते तू फक्त डोळ्यांची लढाई 

जिंकणे सहजी तुझे ते आठवे अजुनी मला


उडून गेले रंग सारे फूल गेले सुकून ते

पाकळ्या मिटल्या तरीही गंध ये अजुनी मला


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Romance