भेटीस तू यावा
भेटीस तू यावा
मेघांच्या धारेतून
स्पर्श तुझा व्हावा
फुलांच्या गंधापरी
श्वासात तू यावा
विरह दूर करण्या भेटीस तू यावा
दीपमाळ तेवती
तुझ्या आठवांची
आठवांच्या सरीतून
मनामध्ये बरसावा
विरह दूर करण्या भेटीस तू यावा
विरहाची झटकून काजळी
प्रितीचा प्रकाश पसरावा
स्वप्नातल्या सुखाचा
प्रत्यय मज यावा
विरह दूर करण्या भेटीस तू यावा

