STORYMIRROR

मिलिंद कोरडे

Romance

3.4  

मिलिंद कोरडे

Romance

प्रणय अश्रूंचा

प्रणय अश्रूंचा

1 min
23.4K


तू जेव्हा जवळ येशील ना...

तेव्हा स्पर्श करण्याची इच्छा असेल माझी तुला...

उतावीळपणा पुरुषात असतोच.. आणि तो स्वाभाविकच आहे..!


पण तू दूरच उभी राहा..

स्पर्श फक्त डोळ्यांनी करण्याची परवानगी दे...

जिवंत सौंदर्यमूर्ती डोळ्यात गच्च भरून घेण्याची मजा काय असते 

हे समजावून सांग मला..!!


पण त्यावेळी माझ्या डोळ्यात येणाऱ्या अश्रूंना बघून...

तू मात्र आवर स्वतःला..!!

त्यावेळी येणारे ते अश्रू आपल्या प्रेमाचे साक्षी असतील..!!

असू देत त्यांना...

वाहू देत..!!


पण जास्त वेळ नको…

अश्रूंच्या पुरात वाहत आलोय मी...

त्यात परत वाहून जाण्याअगोदर...

माझ्या जवळ येऊन माझ्या बंद डोळ्यांखाली ओघळलेले तेच अश्रू ...

फक्त तुझ्या गुलाबपाकळीसारख्या नाजूक सुकुमार ओठांनी सहज टिपून घे..!!


आणि जेव्हा मी हळूच डोळे उघडेल तेव्हा त्यात फक्त आणि फक्त तुझेच डोळे असावेत..!!


त्यांनतर तुझ्या मिठीत घेऊन...

भाग पाड मला स्वतःला विसरायला...

हल्ली हरवलोयच मी पण विखरून हरवलेल्या मला तुझ्या प्रेमाच्या बंधनात गच्च बांधून तुझ्या कुंतलछायेतच हरवू दे..!!


शरीरावरची नकोशी वस्त्रप्रावरणे आणि आत्म्यावरची नकोशी मोहाची बंधने हळूच दूर करूयात आपण दोघेही..!!


निरभ्र असेल अवकाश पण तरी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊन वर्षा अशी बरसावी की...

आयुष्यभर ज्या काही एकांताच्या जाळ्या मनावर चढलेल्या त्या सगळ्या धुवून जाव्यात..!!

अगदी स्वच्छ व्हावं.. पवित्र व्हावं...

मन.. शरीर.. आत्मा..!!


त्या वर्षावानंतरही जेव्हा विलग होताना तुझ्या डोळ्यात अश्रू येतील ना ते मात्र मला माझ्या ओठांनी टिपू दे..!!


नाही म्हणू नकोस..!!


अश्रूंपासून सुरू झालेला हा प्रणय अश्रूंवरच जर संपवता आला..

तर आयुष्यभर पुन्हा अश्रूंना आपलाच हेवा वाटेल..!!


Rate this content
Log in

More marathi poem from मिलिंद कोरडे

Similar marathi poem from Romance