Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

मिलिंद कोरडे

Romance

3  

मिलिंद कोरडे

Romance

चहा

चहा

1 min
12.3K


ऐ...

ऐकतेस का.?

सकाळ दुपार संध्याकाळचा चहा आहेस तू माझा..!

आता तू मला वेडा समजशील..

वेंधळट समजशील...

म्हणशील...

अरे लोक आपल्या प्रेयसीला...

चंद्र-तारका... नक्षत्रे...

नदी...सरिता....

फुल ..गुलाब.. बाग

यासारख्या उपमा देतात अन काय तू..?

चहासोबत.?


तसा आहेच वेडा म्हणा...

पण हो..

चंद्र तारका नक्षत्रे यांची उपमा देणार नाही, कारण ते आवाक्याबाहेरचे आहेत

नदी सरिताांचू उपमा देणार नाही, कारण ते थांबत नाहीत

फुल गुलाब बाग यांचीही उपमा देणार नाही, कारण नाशवंत आहेत

पण चहा...

सकाळी उठल्यावर पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे... चहा

दुपारी कामाचा थकवा घालवणारी गोष्ट म्हणजे... चहा

संध्याकाळी निवांतपणाचा भाव देणारी गोष्ट म्हणजे... चहा

तू ही त्या चहासारखीच तर आहेस...

आठवण...तू

ताजेपणा...तू

निवांतपणा.. तू


आणि

दिवसभर थकून भागून...

संध्याकाळी खिडकी शेजारच्या स्टडी टेबलवर बसून

मंद मंद वारा धुंद धुंद करत असताना

बाहेरच्या गुलाबकळीकडे बघून

सुचलेल्या ओळी डायरीवर लिहिण्याअगोदरचा

चहाचा घेतलेला घोट आहेस तू..!!


अशीच सोबतीस राहा कायम...

रोजच्याच जगण्याच्या धगित..

वेदनेला पाण्यासारखं उकळून...

जबाबदारी अन कर्तव्याची चहापूड मिसळून

काळ्याशार झालेल्या आयुष्यात...

तुझ्या आठवणींचे शुभ्रधवल क्षीर आणि

तुझ्या ओठांतून सहजच सांडणारी शब्दशर्करा टाकून

जे काही त्या प्रेमाच्या कपात उतरतं ना.?

तो चहा आहेस तू..!!

आणि तुला वाईट वाटलं तरी चालेल

पण तू माझं दुसरं प्रेम असशील

पहिलं कायम असेल...

ते फक्त आणि फक्त... चहा...


Rate this content
Log in

More marathi poem from मिलिंद कोरडे