गारवा
गारवा
चंद्रकिरणाने सजले होते अंबर.
नभांगणी तारकांचे लागले झुंबर.
प्रितीचा जणू झुलवित झुला.
आठवते सारे माझा खुळ्या मनाला.
शरदाच्या चंद्रकिरणात सखा भेटला.
सप्तरंगी प्रेमाचा छटा उमटलेल्या.
माझा ह्दयात जागा दिली रे तुला.
ठेवीन सुखात दिले वचन तू मला.
प्रेमाचा गारवा ओसंडुन वाहला.
प्रेमाच्या बंधनात जीव हळू हळू गुंतला.
मिळाले वास्तवाचे स्थान या जीवाला.
दिले ह्दय तूला अन श्वास घेतला.
गुलाबी गारवा, स्वप्नांचा खजिना घेऊनि
पापणीच्या तिजोरी, बंद स्वर्ग ठेवूनि.
सोनेरी किरणांची सडे अंगणी,
फुलांच्या बेधुंद सुगंधात झुले बहरूनी.
मागोवा घेत राहतो जीव हा खुळा.
आयुष्याचा दोघांनी ही डाव जिंकला.
स्वप्नलहरीच्या प्रणय क्षणात बहरला.
चंद्रकिरणाच्या साक्षीने लग्नबेडीत अडकला.
गारव्याने चढली प्रेमास बेधुंद नशा.
द्विगुणित करतोय मिलनाची आशा.
तुझ्याच नयनीची वाचत भाषा ,
बसावे हिच असते सदैव अभिलाषा.

